मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. अशातच आता सत्तधारी भाजपमधील आमदाराने याच मुद्द्यावरून आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सगेसोयऱ्यांची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत वाशी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पत्रही दिले होते. आता त्याच्या अंमलबजावणीत सरकार दिरंगाई का करतंय? असा सवाल भाजप आमदार सुरशे धस यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. आज पाठवलेल्या शिष्टमंडळाने तरी जरांगे यांची एखादी प्रमुख मागणी मान्य करायला हवी, असे सुरेश धस म्हणाले.
गोड बोलून काटा काढण्याचा कट! मनोज जरांगे यांचा सरकारवर आरोप; तब्येत खालावली, उपचार घेण्यास नकार
राज्य सरकारचे शिष्टमंडळ अंतरवालीत जाणार आहे. त्यांनी चर्चेत वेळ घालवण्यापेक्षा बाकीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कालावधी घ्यावा. तसेच सगेसोऱ्यांच्या बाबतीत तातडीने एकत्र बसून लगेच अंमलबजावणी केली पाहिजे. आणि सगेसोयऱ्यांचा विषय संपवला पाहिजे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
याद राखा! शब्द फिरवलात तर सलाईन काढून टाकेन! सरकारच्या दुर्लक्षामुळे जरांगे संतापले