मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालल्याने मराठा समाज रस्त्यावर, धुळे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको

सरकारने तत्काळ दखल घेण्याची मागणी करत मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाज रस्त्यावर उतरला असून आज धुळे -सोलापूर महामार्गावर मराठा समाजाचा तीन तासांपासून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र सरकार जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करत नाही. त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असताना त्यांच्या उपोषणाची शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. शासनाचं कोणतंही शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलं नाही. त्यामुळे मराठा समाज आक्रमक होऊन मराठा समाज रस्त्यावर उतरला असून, धुळे- सोलापूर महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला आहे. त्याचबरोबर मराठा आंदोलकांच्या जोरदार घोषणाबाजी सुरु आहेत.

सोलापूर- धुळे -जालना- बीड राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. मराठा समन्वयकांनी समजूत घातल्यानंतर जालना-बीड महामार्गावरचा रास्ता रोको मागे घेण्यात आला. परंतु सोलापूर- धुळे महामार्गावर रास्ता रोको सुरु आहे. तेथे मराठा समाज आक्रमक झाला असून पोलिसांसह कोणाचे ऐकायला तयार नाही.

सोलापूर- धुळे महामार्गावर सलग तिसर्‍या दिवशी रास्ता रोको आंदोलन करण्यात येते आहे. आज मात्र मराठा आंदोलक कमालीचश्े आक्रमक होवून तीन तासापासून महामार्गावर दोन्ही बाजूनं महिला -पुरुष रस्त्यावर उतरले आहे. वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.