…तर राज्यात भाजप शिल्लक राहणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

मराठा आरक्षणाला विरोध कोण करतय हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. फडणवीस सापळा रचत आहेत. दर चार दिवसाला आपलेच काही मराठे आमदार आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा फडणविसांना सांगतोय, मराठ्यांचा नाद सोडून द्या, नाही तर राज्यात भाजपाचे बीसुद्धा शिल्लक राहणार नाही असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला. परळी येथे मराठा आरक्षणासाठी आयोजित घोंगडी बैठकीमध्ये ते बोलत होते.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, आरक्षणासाठी लढाई आपल्याला जिंकायची आहे. म्हणून या घोंगडी बैठकीचे आयोजन केले आहे. आपला सागडी बैठकीचे आयोजन आहे आपला हल्लाबोल सरकारसमोर आता कुठलाही पर्याय नाही. मराठ्यांना आरक्षण मिळणार नसेल तर सरकारलाही सत्ता नाही असे ठणकावले. विरोधकांचा कार्यक्रम होणार यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …तर राज्यात भाजपा शिल्लक राहणार नाही यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस मराठ्यांचा नाद सोडून द्या, नाही तर महाराष्ट्रात भाजपा बियाण्यालाही शिल्लक राहणार नाही. दर चार दिवसाला फडणवीस सांगतात तसा आपलाच आमदार आरक्षणाच्या विरोधात बोलत आहे. जो कुणी मराठा आरक्षणाच्या विरोधात येईल. या निवडणुकीत त्याचा कार्यक्रम होणार हे नक्की आहे असा इशारा त्यांनी दिला.

फडणविसांनी वेदना समजून घ्याव्यात कधी तरी फडणविसांनी मराठ्याच्या घरी जावून बसावे, त्यांच्या वेदना समजावून घ्याव्यात, आमचा बांधव पायाला फडकं बांधून शेतात राबतो आहे. एक एक रूपया गोळा करून लेकराला शिकवतो आहे. या वेदना फडणविसांना कशा समजणार?. या सरकारने मराठा समाजाला आणि धनगर समाजाला वेड्यात काढले आहे. आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणाने माझ्या शरीराचे वाटोळे झाले आहे तरी मी लढत आहे. हेच आरक्षण ४० ते ५० वर्षाखाली दिले असते तर आज समाज कुठे गेला असता असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

धनंजय मुंडे रात्री 3 वाजता आंतरवालीत वडीगोद्री

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी रात्री 3 वाजेनंतर आंतरवाली सराटी येथे येऊन भेट घेतली. यावेळी यांच्यासोबत आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा झाली, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी परळीला निघण्यापूर्वी आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. कृषिमंत्री चांगलं काम करत असतील तर त्यांचं कौतुक का करू नये, चुकल्यावर त्यांना सोडणार देखील नाही असा चिमटा देखील जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना काढला. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांशिवाय कुणाचाही होऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. निवडणूक लढवायची की नाही याबाबत समाजाची बैठक घेऊनच निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा

मराठा समाज तुमची मालमत्ता आहे का, या भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रचलेला ट्रॅप आहे. ते लोक जे बोलताहेत, त्यांना गरीब मराठा मोठा होऊ वाटत नाही. सगळ्या संघटना फोडल्या. काही समन्वयक फोडले. ज्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही, असाच भाजपमधील मराठा आमदार बोलायला लागला आहे. वेळ येऊद्या मराठे तुम्हाला कसे सरळ करतात ते बघा, असा इशारा त्यांनी दिला.

मराठ्यांचा अंत पाहू नका

मराठ्यांच्या वेदनांची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार आहे. मराठा समाजाची अवस्था अत्यंत बिकट आहे त्यांचा अंत पाहू नका. आरक्षण मिळाले नाही तर महाराष्ट्रात पायही ठेवू देणार नाही. आमचं आरक्षण फक्त सत्ताधाऱ्यांनी रोखलंय, मराठा आणि कुणबी एकच आहे. तो २००४ चा कायदाही रद्द करण्यात आलाय. जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिले तर माझ्या समाजाला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही.