भायखळ्यात गद्दारांना गाडलंच! मनोज जामसुतकर यांचा प्रचंड मतांनी विजय

शिवसेनेशी गद्दारी करून मिंध्यांशी संधान साधलेल्या भायखळा मतदारसंघातील मिंधे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा दारुण पराभव झाला आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनोज जामसुतकर यांनी 31,361 एवढ्या मताधिक्क्याने विजय मिळवला.

भायखळ्यातील सर्वाधिक आणि एकगठ्ठा मते असलेला मुस्लिम मतदारच पाठीशी उभा राहिल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार मनोज जामसुतकर यांच्यात सत्तर हत्तींचे बळ मिळाले होते. प्रचारामध्येही त्यांना आघाडी घेतली. याचे रुपांतर मतांमध्येही झाले. मनोज जामसुतकर यांना 80,133 मते मिळाली, तर यामिनी जाधव यांना 48,772 मते मिळाली.