मणिपुरात पुन्हा हिंसाचार; 4 पोलीस कमांडो, 3 जवान जखमी

मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. सोमवारी चार लोकांचा गोळीबारात मृत्यू झालेला असताना आज मंगळवारी सुरक्षा दलाचे 7 जवान जखमी झाले आहेत. यात चार पोलीस कमांडो आणि तीन बीएसएफचे जवान आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. नववर्षाचा पहिलाच दिवस मणिपुरात रक्तरंजीत ठरला. या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी एक व्हिडीओ प्रसारित करीत हिंसाचाराचा निषेध केला. तसेच लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या हिंसाचारानंतर थौबल, इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम, काकचिंग आणि बिष्णूपूर या जिह्यात संचारबंदी लावण्यात आली आहे.

मणिपुरातील दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध सीबीआयने दोन वेगवेगळे आरोपपत्र दाखल केले आहेत. सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले आहे.