DJ च्या आवाजाने व्यक्तीला ब्रेन हॅमरेज, मेंदुच्या नसा फाटून मृत्यू

DJ च्या आवाजाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. डीजेच्या आवाजामुळे या व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झाला, त्याच्या मेंदूची नस फाटली आणि रक्ताच्या गुठळ्या झाल्या. दुर्दैवाने उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

बलरामपूरमध्ये 9 सप्टेंबरला 40 वर्षीय संजय जैस्वालला अचानक चक्कर आणि उलट्या सुरू झाल्या. तेव्हा संजयला तातडीने रुग्णालयात दाखल कले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संजयचे सीटीस्कॅन केले. तेव्हा संजयच्या मेंदूची नस फाटल्याचे दिसले. तसेच त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठीही तयार झाल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार संजयचा डीजे भाड्याने द्यायचा व्यवसाय होता. ज्या दिवशी संजय चक्कर येऊन पडला तेव्हा त्याला एका ठिकाणी डीजेची ऑर्डर मिळाली होती. डीजे चालवतानाच त्याला चक्कर आली. संजयला कुठलाही आजार नव्हता, संजयला उच्च रक्तदाबाचाही त्रास नव्हता. एखादा सामान्य माणूस 70 डेसिबलपर्यंत आवाज सहन करू शकतो. पण डीजेमधून 150 डेसिबलपर्यंत आवाज येतो. त्यामुळे डीजेच्या आवाजामुळेच संजयचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.