लोनच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत

ई-वॉलेट खात्याच्या माध्यमातून लोन देतो असे सांगून भाजी विव्रेत्याची फसवणूकप्रकरणी एकाला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. अंकुश उमेश मिश्रा असे त्याचे नाव आहे. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

आग्रीपाडा परिसरात तक्रारदार राहतात. त्याचा सातरस्ता परिसरात भाजीचा व्यवसाय आहे. त्यांना काही दिवसांपासून लोनबाबत पह्न येत होते. तक्रारदार वापरत असलेल्या ई-वॉलेटवरदेखील लोनबाबत अपडेट येत असायचे. एप्रिल महिन्यात त्यांना एकाचा पह्न आला. एका ई-वॉलेट अॅप्सवर लोनची ऑफर असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तक्रारदार यांना लोनची गरज असल्याने त्याने लोनसाठी होकार दिला. होकार दिल्यावर कागदपत्रे तपासण्यासाठी एक जण येणार असल्याचे त्यांना सांगितले. त्यांना कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितली. त्यावर विश्वास ठेऊन त्याने कागदपत्रे तयार ठेवली.

फसवणुकीनंतर त्याने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक योगेंद्र पाचे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या पथकातील उपनिरीक्षक उमेश करंजावणे, मोरे, रणदिवे आदी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी अंकुशला विरारमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडून सिमकार्ड, डेबिट कार्ड आणि विविध क्यूआर कोड जप्त केले. त्याने ती रक्कम कोणाला दिली, लोन कसे घेतले, ती रक्कम इतर खात्यात कशी वळवली, त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

अशी केली फसवणूक

कागदपत्रे तपासल्यावर तीन दिवसांत लोन मिळेल असे त्यांना सांगितले. त्याचदरम्यान तक्रारदार याचा पह्न सुरू होत नव्हता. त्याने नेटवर्क पुरवणाऱया पंपनीत जाऊन सेवा पुन्हा सुरू केली. तसेच एकाच्या दुकानातून ते पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पैसे निघत नव्हते. बँकेत जाऊन चौकशी केली तेव्हा त्याच्या खात्यातून 95 हजार रुपये विविध खात्यांत गेल्याचे समजले.