फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या नावाखाली आणि ऑनलाइन गेमिंग आयडीच्या नावाखाली फसवणूक प्रकरणाची उकल करण्यात सांताक्रूझ पोलिसांना यश आले आहे. मध्य प्रदेश येथून एका ब्रोकरला पोलिसांनी अटक केली आहे, तर गेमिंग आयडी फसवणूक प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग आढळून आला आहे.
सांताक्रूझ येथे राहणारे तक्रारदार हे मॅनेजर आहेत. गेल्या वर्षी त्यांना एकाचा पह्न आला. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जास्त नफा मिळवून देतो असे त्यांना सांगण्यात आले. ठगाने त्यांना एक बनावट अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्याकडून 4 लाख 48 हजार रुपये उकळले. त्यानंतर शेअर मार्पेटमध्ये तोटा झाला असे सांगून त्यांची फसवणूक केली. फसवणूकप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा नोंद केला. सहाय्यक आयुक्त महेश मुगुटराव यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक अमर पाटील, ज्योती हिबारे, सुर्वणा हुलवान, उपनिरीक्षक दत्तात्रय खडे, सुरवसे, राणे, हसनाळे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना बँक खाती आणि ई-मेल आयडीची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस इंदोर येथे पोहचले. लुसडिया पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी सुजित सूरज सिंग सेंधवला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाईल पह्न, तीन सिमकार्ड आणि लॅपटॉप जप्त केला आहे. सुजित हा ब्रोकिंगचे काम करतो. त्याने यापूर्वी कोणाची अशाप्रकारे फसवणूक केली का, याचा पोलीस तपास करत आहेत.
सांताक्रूझ येथील एका स्टुडिओमध्ये तक्रारदार हे आर्टिस्ट म्हणून काम करतात. त्याने एका गेमिंग पंपनीचा युनिक आयडी 7 लाख रुपयांना विकत घेतला होता. गेल्या वर्षी त्यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी तो आयडी विकायचे ठरवले. एका युजरने तक्रारदार यांना संपर्क करून तो आयडी विकत घेत असल्याचे भासवले. त्याचा विश्वास संपादन करून त्याच्या मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन फसवणूक केली. फसवणूकप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर पोलीस हे त्रिपुरा येथे गेले. चौकशीदरम्यान त्याने तो गेमिंग आयडी मीरा रोड येथील एकाला विकल्याचे समजले. त्या मुलाकडून पोलिसांनी एक मोबाईल हस्तगत केला आहे.
गाडी पाठवण्याच्या नावाखाली निर्मात्याला लावला चुना
मोहाली येथे गाडी पाठवण्याच्या नावाखाली ठगाने निर्मात्याला चुना लावला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे निर्माते आहे. त्यांना त्याची जुनी गाडी पंजाब येथे पाठवायची होती. गाडी पाठवण्यासाठी ऑनलाइनवर नंबर सर्च केला तेव्हा त्यांना एक नंबर दिसला. त्या नंबरवर त्याने पह्न केला. चर्चेनुसार दोन जण गाडी घेण्यासाठी त्याच्या घरी गेले. गाडी घेतल्यावर दोघांनी त्यांना एक पावती दिली. गाडीचा विमा आणि उर्वरित पैसे पाठवण्यासाठी पावती दिली. त्या पावतीवर एक क्यूआर कोड होता. त्या कोडवर पैसे पाठवण्यास सांगितले. तळोजा येथून ती गाडी पाठवली जाईल असे त्यांना सांगण्यात आले. गाडी शिळफाटा येथून गेल्याचा त्यांना फास्ट टॅगवर मेसेज आला. त्यामुळे त्याने बँकेत तक्रार केली. त्यानंतर ठगाने त्यांना पह्न करून बॉर्डर चार्जेस, जीएसटी आणि सर्व्हिस चार्जेसच्या नावाखाली पैसे पाठवण्यास सांगितले. जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत गाडी पाठवली जाणार नाही असे त्यांना सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने कुरिअर पंपनीत जाऊन चौकशी केली. त्या पावत्या बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.