माझी फसवणूक झाली, बायकोच्या लिंग चाचणीसाठी तरुणाची उच्च न्यायालयात धाव

delhi-high-court

दिल्ली उच्च न्यायालयात एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने न्यायालयात आपल्या पत्नी विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. पत्नीची लिंग चाचणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्याने केली आहे. आपल्याला फसवून एका तृतीयपंथीयाशी लग्न लावल्याचा आरोप त्याने केला आहे.

केंद्र सरकारच्या रुग्णालयात पत्नीची लिंग चाचणी करावी, अशी विनंती पतीने केली आहे. लग्नाआधी ती तृतीयपंथीय असल्याचे लपविण्यात आले. या फसवणुकीमुळे त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत आपलं लग्न बेकायदेशीर आहे, असा आरोप त्याने केला आहे.

खरंतर लिंग चाचणी ही फार खासगी गोष्ट आहे. मात्र, विवाहाच्या बाबतीत पती-पत्नी दोघांच्याही हक्कांवर परिणाम होतो.  आपल्या पत्नीला विशेषत: पालनपोषणासाठी किंवा स्त्रियांच्या रक्षणासाठी बनवलेल्या कायद्यांतर्गत आरोप करण्याचा अधिकार नाही. कारण या कायद्यांनुसार ती ‘स्त्री’ म्हणून पात्र नाही, असे याचिकेत पतीने म्हटले आहे.

पत्नीच्या वैद्यकीय तपासाचा खर्च द्यायला तयार आहे. गरज पडली तर तो स्वत:ची वैद्यकीय चाचणी करायलाही तयार आहे. याचिकाकर्ता तरुणाने आधी ट्रायल कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र. ती फेटाळण्यात आली होती. आता त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. आपल्या हक्कांशी तडजोड केली जात आहे. मात्र, न्यायासाठी वैद्यकीय चाचणी होणे गरजेचे आहे, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.