महाराष्ट्र, दिल्लीच्या निवडणुका भाजपने कशा जिंकल्या? ममता बॅनर्जींचा मोठा दावा

महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्लीत निवडणूक आयोगाचा खेळ देशाने पाहिला आहे. आता पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा खेला होबे होणार आहे. त्यासाठी आपण सज्ज असायला हवे. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्लीची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. आता आम्हाला त्यांचे डाव समजले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी ठणकावले.

पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यात मोठा खेला होबे होणार आहे. कोलकात येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला. 2021 मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी ‘खेळा होबे’ हा नारा दिला होता. तेव्हापासून हा नारा देशभरात लोकप्रिय झाला. त्यावेळी निवडणुकीत भाजपच्या आक्रमक प्रचारानंतरही ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवत खेला होबे हे सिद्ध केले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा पक्ष कार्यकर्त्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे.

टीएमसीच्या निवडणूक व्यवस्थापनाची काळजी आयपैक कंपनीकडे देण्यात आले आहे. ही प्रशांत किशोर यांची आयपैक नाही. त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी IPAC समजून घेतले पाहिजे आणि त्यांना सहकार्य केले पाहिजे. भाजपकडे प्रचाराच्या काम बघणाऱ्या 50 एजन्सी आहेत. मात्र, आपण एकच ठेऊ शकतो. आता त्यांना सहकार्य करत आपण आपले काम जनतेपर्यंत पोहचवले पाहिजे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्लीसारखाच डाव भाजप पश्चिम बंगालमध्ये खेळत आहे. त्यांनी एक कंपनी आपल्या राज्यात पाठवली आहे, ते पश्चिम बंगालच्या मतदार यादीत हरियाणा आणि राजस्थानमधील लोकांची नावे जोडत आहेत. हे ऑनलाइन केले जात आहे. अशाप्रकारे भाजप बंगालच्या संस्कृतीवर हल्ला चढवत आहे. आपली संस्कृती एबाधित ठेवायची असेल तर त्यांचा हा डाव उधळायला हवा, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला इशारा देत म्हटले की, आम्ही महाराष्ट्र, हरयाणा किंवा दिल्ली नाही, हे चांगले लक्षात ठेवा. त्यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीत कशाप्रकारे काम केले, हे देशाने बघितले आहे. आम्ही निवडणूक आयोगासमोर निषेध करू. आता आम्हांला त्यांचा डाव समजला आहे. जर आपण 26 दिवस धरणे धरू शकतो, तर निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पूर्वीसारखी होण्यासाठी आपण त्यांच्या कार्यालयासमोरही धरणे आंदोलन करू, असा इशाराही ममता बॅनर्जी यांनी दिला.