म्हणे ममता बॅनर्जी खोटे नरेटिव्ह सेट करताहेत; अर्थमंत्र्यांचे उलटा चोर कोतवाल को डाटे

दिल्लीतील नीती आयोगाच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बोलत असताना पाचव्या मिनिटाला माईक बंद करण्यात आला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता ममता बॅनर्जी खोटे नरेटिव्ह सेट करत आहेत, असा आरोप केला आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांची अवस्था उलटा चोर कोतवाल को डाटे अशी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अर्थमंत्र्यांनी ममता बॅनर्जी यांचा दावा फेटाळला आहे. त्यांचे आरोप पूर्णपणे खोटे असून आम्ही सर्वांनीच त्यांचे बोलणे पूर्ण ऐकले. प्रत्येक मुख्यमंत्र्याला एक वेळ आखून देण्यात आली होती. ही वेळ प्रत्येकाच्या टेबलवरील स्क्रीनवर दिसत होती. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना तब्बल 20 मिनिटे बोलायला दिले. आसाम, गोवा, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना 10 ते 12 मिनिटे बोलू दिले, पण मला मात्र केवळ पाच मिनिटे बोलू दिले. हे अत्यंत चुकीचे आहे. असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.