पंढरपूरजवळ भरधाव ट्रकने 5 महिलांना चिरडले, तीन जण गंभीर

पंढरपूरजवळ भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव ट्रकने पंढरपूरजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजूर महिलांना चिरडण्यात आले आहे. यात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे तर तीनजण गंभीर जखमी झाल्या आहेत.

पंढरपूरजवळच्या कटफळ गावाजवळ हा अपघात झाला. जखमींना पुढील उपचारासाठी पंढरपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 20 चाकी मोठा ट्रक वेगाने येत होता. यावेळीला मजूर महिला कडेला थांबल्या होत्या.ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.