अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, कार्यकर्त्याचे उपोषण

आमदार अब्दुल सत्तार यांनी 2009 ते 2011 या काळात सिल्लोड तालुक्यातील अंभई, अंधारी, सोयगाव आणि फरदापूर या चार ग्रामपंचायतींना गावात सभागृह बनवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता; परंतु अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्तार यांनी त्यांची शैक्षणिक संस्था नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या खोल्या बनवण्यासाठी निधीचा गैरवापर केला, असा आरोप करत एका सामाजिक कार्यकर्त्याने सत्तार यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे.

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपैल्ली यांनी केली आहे.