मराठ्यांचा नादी लागू नका, तुमच्या सर्व जागा पाडू; मनोज जरांगे यांचा अमित शहांना इशारा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी मराठा आंदोलनाला हिणवले होते. अशी अनेक आंदोलने आम्ही हाताळली आहेत, असे वक्तव्यही त्यांनी केले होते. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अमित शहा यांना थेट इशारा दिला आहे. मराठ्यांच्या नादी लागू नका, तुमच्या सर्व जागा पाडू, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. तसेच तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिले तर सत्ता मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मराठ्यांच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही सरकार स्थापन होणे शक्य नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाबाबत आपण जाहीरपण सांगतो की, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांना आरक्षण द्यावेच लागणार आहे. धनगरचा जीआर सरकार काढणार असेल तर मराठा आणि कुणबी देखाील एकच आहे हा जीआर निघायला सरकारची काहीच काहीच हरकत नसावी. सरकार दुजाभाव करू शकत नाही. याबाबतचा अध्यादेश निवडणुकीआधीच काढावा लागणार आहे. मराठ्यांच्या पाठिंब्याशिवाय कोणीही सत्ता स्थापन करू शकत नाही, असेही जरांगे म्हणाले. आरक्षण हा राजकीय आणि वादाचा मुद्दा नाही. ही समस्या सोडवण्यासाठी सामंजस्य आणि मनाचा मोठेपणा लागतो. माणुसकीचा विचार मनात असला पाहिजे, असेही जरांगे म्हणाले.

आम्ही निवडणुकीत भुजबळ यांच्या आवाहनाप्रमाणे आम्ही जागा निवडून आणल्या तर ते त्यांचे आरक्षण सोडून मराठा समाजाला आरक्षण देणार का, ते राजकारण सोडून देणार का, गोरगरीबाचा करत असलेला विरोध थांबवला का, ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण असतानाही तुम्ही विरोध करत आहात. हे सर्व थांबवणार का, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये थांबवला का, असे अनेक सवाल जरांगे यांनी केले.