Blood Donation : महाराष्ट्रातल्या माऊलींची कमाल! पहिल्यांदाच 20 लाख युनिट रक्तदान !!

महाराष्ट्रातील रक्तदान मोहीमेत राज्यातील माता-भगिनींनी सर्वांसमोर आदर्श निर्माण करत मोठी कमाल केली आहे. राज्यात गेल्या वर्षी 2023 मध्ये महाराष्ट्रातील महिलांनी 20 लाख युनिट रक्तदानाचा मोठा टप्पा पार केला आहे. राज्यातील महिला रक्तदात्यांच्या वाढत्या संख्येने हे यश मिळाले आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच महिलांनी 20 लाख युनिट रक्तदान केले आहे.

जागतिक रक्तदान दिन 14 जून रोजी म्हणजे शुक्रवारी साजरा करण्यात आला. या निमित्ताने राज्य रक्त संक्रमण परिषदेने महत्त्वाची माहिती दिली. राज्यात एकूण रक्तदानात महिलांचा वाटा वाढून 5.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. पुरुष रक्तदात्यांच्या तुलनेत हा आकडा छोटा असला तरी महिला रक्तदात्यांची संख्या वाढत असल्याचा बदलता ट्रेंड समोर आल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019 ते 2021 दरम्यान 15-49 वयोगटातील 57 टक्के महिलांमध्ये अशक्तपणा आढळून आला. त्यानंतरही 2023 मध्ये महिला रक्तदात्यांच्या संख्येच लक्षणीय वाढ होऊन 2022 मध्ये ती 5 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यापूर्वी 2021 मध्ये ही संख्या 4.3 टक्के इतकी होती.

महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी रक्तदानात महिला रक्तदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2022 मध्ये राज्यात 96 हजार महिलांनी रक्तदान केले होते. 2023 मध्ये महिला रक्तदात्यांनी उंच उडी घेतली 1 लाखाहून अधिकजणींनी रक्तदाने केले. रक्तदानात आम्ही मागे नाहीत, हे राज्यातील महिलांनी दाखवून दिले आहे आणि ही कौतुस्पाद बाब आहे, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. महेंद्र केंद्रे यांनी सांगितले. या वर्षीही मे महिन्यापर्यंतच्या रक्तदानाचा विचार केल्यास 6.52 महिलांनी रक्तदान केले आहे, असे डॉ. केंद्र यांनी पुढे सांगितले.