मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाला जो विरोध करेल त्याचा पराभव निश्चित आहे, असे जरांगे म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस गोड बोलून आमची मान कापण्याचा प्रयत्न करत आहेत. असा हल्लाबोलही त्यांनी केला. मराठा आरक्षणाला विरोध करणारे या निवडणुकीत टिकणार नाही. जनता त्यांचा योग्य निकाल लावेल, अशा शब्दांत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस गोड बोलून आमची मान कापायचे प्रयत्न करच आहेत. बार्शीच्या आमदाराला सांगून मराठा विरुद्ध मराठा उभे करत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी त्याला पूर्ण बळ दिलं आहे. पण तो निवडणुकीत टिकणार नाही. मराठ्यांच्या विरोधात जावू नये. आता फडणवीस यांनी हे सर्व बंद करावे,असेही जरांगे म्हणाले.
मी छगन भुजबळांना मोजत नाही. त्यांचे काय करायचे ते जनता ठरवेल. सर्व वेळेवर कळेल. फक्त मराठा आरक्षणाला विरोध करु नको. मी सर्वच नेत्यांना सांगतो, मराठा आरक्षणाला विरोध करु नका. मराठा आरक्षणाला विरोध तर मग कितीही मोठा जहांगीरदार असूद्या, तो गेला म्हणजे गेला. त्याचा पराभव झाला, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
आम्ही राजकीय भूमिका घेतली नाही. कोण निवडून येणार आणि कोण पडणार याचा निर्णय होणार आहे. देवेंद्र फडणवीस आतापासूनच तंगड्या गळाल्या का, ते आतापासूनच म्हणतात की, त्यांचे सरकार येणार आहे. आम्ही तुमचे विरोधक नाही आणि शत्रू नाही. मराठ्यांना आरक्षण देऊन टाका, असे जरांगे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आणि आरोग्य मंत्र्यांच्या बंगल्यावर एक बैठक केली आणि तिथे काहीतरी शिजले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.