काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 23 उमेदवारांचा समावेश

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या नावाची घोषणाा करण्यासाठी सर्वच पक्षांची लगबग वाढली आहे. आता काँग्रेस पक्षाने त्यांनी दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली असून त्यात एकूण 23 उमेदवारांचा समावेश आहे. याआदी काँग्रेसने 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आता 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहेत. अशाप्रकारे काँग्रेसकडून 71 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रसच्या या दुसऱ्या यादीमध्ये भुसावळ, वर्धा, अकोट या मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता प्रचाराला वेग येणार असून उमेदवारांना पुढची दिशा ठरवता येणार आहे. सुरुवातीला 48 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतील 23 उमेदवार आणि मतदारसंघ

भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गणगणे
वर्धा – शेखऱ शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरिश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुलकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
वसई – विजय पाटील
कांदिवली पूर्व – काळू बधेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळीवाडा – गणेश यादव
श्रीरामपूर – हेमंत ओगले
निलंगा – अभय कुमार साळुंखे
शिरोळ – गणपतराव पाटील