डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा; विधानसभा निवडणुकीशी कारवाईचा संबंध असल्याची शक्यता

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत आहे. तसेच भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांची नाराजी उफाळून आली आहे. अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काहीजणांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. बंडखोरांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काहीजण एकण्याच्या मनस्थितीत नसून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याविरोधात भाजप ईडी, सीबीआयचा, इन्कमटॅक्सचा वापर करत आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करणार असल्याची चर्चा असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या मेहुण्याच्या घरी आयकर विभागाने छापा टाकल्याने याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.

पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रूपये पकडल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एका राजकीय घडामोडीची चर्चा होत आहे. भाजपशी बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सासरी आयकर विभागाने छापे टाके आहेत. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करणार असल्याची चर्चा असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या मेहुण्याच्या घरी म्हणजेच चंद्रकांत कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकडले आहे.

चंद्रकांत कटके त्यांच्या वाघोली येथील घरात सकाळी अधिकारी पोहोचले. कोथरूड मधून विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांना मन वळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, भाजपचा या प्रयत्नांना यश येत नसल्याने आयकर विभागाने ही कारवाई केल्याची शक्यता आहे. अभिजीतने यापूर्वी एकवेळा महाराष्ट्र केसरी तर दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी ठरला आहे. अभिजीत कटके पुण्यातील शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे. अभिजीतने 2015 मध्ये युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. अभिजीतने 2016 मध्ये ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. या कारावईमुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.