लाडक्या वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये अदा केल्याने महायुतीचा दुतोंडी चेहरा उघड पडला. यावरून टीका होऊ लागल्यानंतर महायुतीने पलटी मारली आहे. प्रशासकीय चूक असल्याचे कारण देत वक्फ बोर्डाला 10 कोटी अदा करण्याचा निर्णय रद्द केला आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा देऊन समाजात भयाचे वातावरण निर्माण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी जीआर काढत वक्फ बोर्डाची तिजोरी भरली होती. मात्र अवघ्या 12 तासांमध्ये हा जीआर मागे घेण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढावली आहे. प्रशासकीय चुकीचे कारण समोर करत जीआर रद्द केला आहे. मुख्य सचिव सुजिता सौनिक यांनी माध्यमांशी बोलताना हा जीआर मागे घेतल्याची माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप तसेच मिंध्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ असा विषारी प्रचार करून समाजात हिंदू-मुस्लिम अशी फाळणी केली होती. खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील सर्व सभांमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणा दिल्या होत्या. भाजप आणि मिंधे हे कसे कट्टर हिंदुत्ववादी आहेत असे भासवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र निवडणूक होताच भाजप आणि मिंध्यांचे हिंदुत्वाचे सोवळे गळून पडले.
बटेंगे, कटेंगे निवडणुकीपुरतेच; वक्फ बोर्डाला 10 कोटी!
वाचा सविस्तर https://t.co/fuCTyVe1wr pic.twitter.com/F7nH38V16F
— Saamana Online (@SaamanaOnline) November 29, 2024
महाराष्ट्रात सध्या मिंध्यांचे काळजीवाहू सरकार आहे. या सरकारला अर्थविषयक कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. असे असतानाही अर्थसंकल्पात वक्फ बोर्डाला मंजूर केलेल्या 20 कोटींपैकी 10 कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला अदा करण्यात आला होता. त्यासंदर्भातील शासकीय अध्यादेश 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात आला होता. मात्र अवघ्या 12 तासांमध्ये प्रसासकीय चूक म्हणत हा जीआर रद्द करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढावली.