विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ‘कोरडा डोळा, कोरडा विहीर, दुष्काळग्रस्त शेतकऱयांना कोण देणार धीर?’ , ‘शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी’, ‘शेतकऱयांची कर्जमाफी झालीच पाहिजे’, ‘कृषीमंत्र्यांच्या जिह्यात बळीराजाचा बळी’ अशी जोरदार घोषणाबाजी करत मिंधे सरकारचा निषेध केला. शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱया या सरकारला अधिवेशनात सळो की पळो करून सोडत शेतकऱयांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱयांवर जोरदार आंदोलन करत शेतकऱयांच्या प्रश्नांकडे महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले.