विधानसभा मतदारसंघात अकार्यक्षम आमदाराला जनता कंटाळली आहे. त्यामुळे मतदार त्यांना घरी बसवतील. आमदारकी कुणाची जहागीरदारी नाही. त्यामुळे या मतदारसंघात परिवर्तन घडणार, मशाल तळपणार आणि हजारोंच्या मताधिक्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रसाद भोईर विजयी होतील, असा विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पेण येथे महाविकास आघाडीचा मेळावा झाला. यावेळी विविध पक्षांतील शेकडो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते मार्गदर्शन करताना म्हणाले, शिवसैनिक पेटून उठला तर त्याच्यासमोर कोणताही उमेदवार तग धरू शकत नाही. मागील आठ महिन्यांपासून प्रसाद भोईर यांनी खेडोपाडी, घरोघरी जाऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. या आघाडीमुळे प्रस्थापितांना घाम फुटला आहे. मतदारसंघातील तरुणाई प्रसाद भोईर यांच्या सोबत आहे. त्यामुळे पेण मतदारसंघात परिवर्तन घडणार, शिवसेनेची मशाल पेटून प्रसाद भोईर आमदार होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, विधानसभा समन्वयक शिशिर धारकर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष महेश पोरे, तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, सुधागड तालुकाप्रमुख दिनेश चिले, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, चंद्रकांत गायकवाड, पेण शहरप्रमुख सुहास पाटील, पाली शहरप्रमुख विद्देश आचार्य, शेकापच्या स्मिता पाटील, दर्शना म्हात्रे, माजी शहरप्रमुख प्रदीप वर्तक, हरिश्चंद्र पाटील, भीमशेठ पाटील, यशवंत पाटील, संतोष पाटील, समीर म्हात्रे, भगवान पाटील, लहू पाटील, राजू पाटील, अनंत पाटील, दर्शना जवके, अच्युत पाटील, चेतन मोकल, वसंत म्हात्रे, अरुणा पाटील, जीवन पाटील, प्रवीण पाटील उपस्थित होते.