महामुंबई मेट्रोने सुरू केली व्हॉट्सॲप तिकीट सेवा

महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत व्हॉट्सअ‍ॅपवर आधारित तिकीट सेवा सुरू केली आहे. नवरात्रोत्सवाच्या औचित्याने या उपक्रमाचे उद्घाटन महिला प्रवाशांच्या हस्ते करण्यात आले. आता मेट्रो लाईन 2A आणि 7च्या प्रवाशांसाठी ही नवीन सुविधा उपलब्ध आहे. यामुळे प्रवासी थेट व्हॉट्सअॅपवरून तिकीट खरेदी करू शकतात. यासाठी स्वतंत्र मोबाइल अ‍ॅपची गरज नाही.

प्रवाशांना 8652635500 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर ‘Hi’ पाठवून किंवा स्थानकांवरील क्यूआर कोड स्कॅन करून संभाषणात्मक यंत्रणेच्या (कन्व्हर्सेशनल इंटरफेस) माध्यमातून प्रवासी तिकीट खरेदी करू शकतात. या संवादात्मक सुविधेत महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे (एमएमएमओसीएल) संचलित करण्यात येणारी सर्व स्थानके व लाईन समाविष्ट करण्यात आल्या आहेत आणि मुंबईच्या मेट्रो नेटवर्कमध्ये ही नवी डिजिटल सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.