निवडणुकीची घोषणा होताच महादेव जानकर यांचा मिंधे-भाजपला धक्का, स्वबळावर लढणार

मंगळवारी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका जाहीर केल्या. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. निवडणूक जाहीर होताच दुसऱ्या दिवशीच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मिंधे भाजपला धक्का दिला आहे. जानकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

महादेव जानकर यांनी विधानसभेला त्यांच्या पक्षासाठी 40 ते 50 जागांची मागणी केली होती. मात्र महायुतीने त्यांना त्याबाबत प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत स्वब्ळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकरांनी परभणी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक महायुतीतून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता.