हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारं, आमदार कैलास पाटील यांची टीका

हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारं सरकार असून केवळ फसव्या घोषणा व विकास कामांना स्थगिती देऊन अडवणूक करणारं स्थगिती सरकार असल्याचा घणाघात महाविकास आघाडीचे धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार कैलास पाटील यांनी केला .

महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास घाडगे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा बलाई मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी कैलास पाटील यांनी सत्ताधारी महायुतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन सोबत घेऊन हा विजय मिळवायचा आहे. या पुढे खासदार, आमदार ग्रामपंचायत पर्यंतच्या सर्व निवडणुका आपण तिन्ही पक्षांना सोबत घेऊन लढवण्यासाठी प्रयत्न करू. महाविकास आघाडी एकत्रीत निवडणूक लढल्यास कळंब बाजार समिती सारखा विजय मिळतो हे गणीत पक्क आहे. हे सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडणार सरकार आहे, असे कैलास पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटातील माजी नगराध्यक्षांचे पती सागर मुंडे यांच्यासह नंदू हौसलमल, बाबुसेठ बागरेचा, शंकर वाघमारे, शकील काझी, महेश पुरी, किरण पाणढवळे (माजी नगरसेवक), अभिषेक मुंडे, लाखन गायकवाड, सचीन सौलाखे, डॉ गोविंद जोगदंड, रोहन हौसलमल सह 150 कार्यकर्त्यांनी आज सागर मुंडेच्या नेत्रुत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने कळंब शहरात शिंदे गटाला मोठे खिंडार पडले असून शिवसेनेचा गड आणखी मजबुत झाला आहे .