महिलांना 3 हजार, बेरोजगार तरुणांना 4 हजार; महाविकास आघाडीचा ‘पंचसूत्री’ वचननामा जाहीर

MVA Manifesto
MVA Manifesto

आज मुंबईतील बीकेसी येथे महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ पार पडली. यासभेत राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा ‘पंचसूत्री’ वचननामा जाहीर करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पावर यांच्या हस्ते हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.

महाविकास आघाडी आपल्या वचननाम्यात पाच गॅरंटी जाहीर केल्या आहेत. यामध्ये महिलांना मासिक आर्थिक मदत, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बेरोजगारांना आर्थिक मदत, कुटुंबांसाठी आरोग्य विमा आदींचा समावेश आहे.

महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटी

• महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.

• शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.

• जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.

• 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.

• बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत.