एक चोरी करायचा, दुसरा CCTV समोर उभा रहायचा; जुळ्या भावांचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले

चोरी करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब चोरांच्या माध्यमातून केला जातो. अशा अनेक घटना तुम्ही वाचल्या किंवा पाहिल्या असतील. मात्र मध्य प्रदेशमध्ये पोलिसांना हैरान करून सोडणार एक चोरीचे प्रकरण उजेडात आले आहे. जुळ्या भावांनी अनोखी शक्कल लढवत अनेकांना गंडा घातला आहे. या चोरांचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मौगंज पोलिसांच्या माध्यमातून चोरीच्या एका प्रकरणाचा उलगडा सुरू होता. त्या अनुषंगाने तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या चोरांमधील एका चोराने पोलिसांना हैरान करून सोडले. 23 डिसेंबरला रात्री मौगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत या चोरांनी सत्यभान सोनी यांच्या बंद घरामध्ये डल्ला मारला होता. यांनी घरातून लाखो रुपयांचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर आरोपी रविशंकर विश्वकर्मा, जगन्नाथ केवट आणि सौरभ वर्मा यांनी पोलिसांनी अटक केले होते.

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला होता. याच दरम्यान सौरभ वर्माचा जुळा भाऊ संजीव वर्मा पोलीस स्थानकात भावाची बाजू मांडण्यासाठी आला. त्याला पाहताच पोलिसही हैरान झाले. तपास केला असता ते दोघे जुळे भाऊ असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता दोघे भाऊ मिळून चोरी करत असल्याचे उघड झाले. एक भाऊ चोरी करायचा, याचवेळी दुसरा CCTV कॅमेऱ्याच्या समोर उभा रहायचा. दोघेही एक सारखे कपडे घालून चोरी करत असे. जेणेकरून चोरी केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणे शक्य होईल. तसेच जेव्हा जेव्हा पोलिस सौरभ वर्माला पकडायचे, तेव्हा तेव्हा सौरभ पुरावा म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रिकॉर्डिंग दाखवून आपली सुटका करून घेत होता. परंतु त्यांचे बिंग आता फुटले असून पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या कडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.