लखनौमध्ये 3 मजली इमारत कोसळली; 28 जखमी 8 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एक तीन माळ्याची इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 24 जण गंभीर जखमी झाले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण जखमी झाले आहेत. या इमारतीत औषध आणि तेल कंपन्यांची चार गोदाम असल्याची माहिती आहे.

लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगरमधील तीन माळ्यांची हरमिलाप ही इमारत कोसळली आहे. इमारतीमध्ये विविध दुकाने होती. घटनेची माहिती मिळताच NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार गोवर्धन शुक्ला यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये हरमिलाप टॉवर येथील तीन मजली इमारत कोसळली. यावेळी तेथील तेथे औषधांनी भरलेला ट्रक उभा होता. या ट्रकचा चालक राजेश पाल शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास त्याच्या सहकार्यांसोबत ट्रकमधील सामान उतरवण्याचे काम करत होते. दिल्लीहून आलेली औषधं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नेली जात होतं. हे काम जवळपास 15 ते 20 लोक मिळून करत होते. यादरम्यान अचामन इमारत कोसळली. साहित्य उतरवण्याचं काम करणाऱ्या लोकांनी पळत जाऊन जीव वाचवला. यावेळी स्थानिकांनी देखील काही लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. अशी माहिती राजेश पाल यांनी दिली.