‘लॉर्ड’ शार्दुल, नाव लक्षात ठेवा! हैदराबादला ‘वेसण’ घातल्यानंतर सोशल मीडियावर ठाकूरचीच हवा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात सामना रंगला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या लढतीत लखनऊने यजमान संघावर 5 विकेट्सने विजय मिळवला. यात महत्त्वाचा वाटा उचलला तो वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने. त्याने 4 विकेट घेत हैदराबादच्या फलंदाजीला वेसण घातले. या कामगिरीबद्दल त्याचा सामनावीर पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला. … Continue reading ‘लॉर्ड’ शार्दुल, नाव लक्षात ठेवा! हैदराबादला ‘वेसण’ घातल्यानंतर सोशल मीडियावर ठाकूरचीच हवा