मुख्यमंत्र्यांच्या गाडय़ा आणि हॉटेलच्या खोल्या तपासण्याची हिंमत  निवडणूक आयोगात आहे का? – संजय राऊत

महाराष्ट्राची लूट करून गेल्या दहा वर्षांत पेंद्रात भ्रष्ट सरकारचा कारभार सुरू आहे. मोदी तर खोटं बोलण्याची मशीनच आहे. पण 4 जूननंतर मोदी सरकार सत्तेवर राहणार नाही, असा जबरदस्त विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. मोदींनी महाराष्ट्राच्या मानगुटीवर घटनाबाह्य सरकार बसवले हा या राज्याला लागलेला कलंक आहे. या घटनाबाह्य सरकारचा पेंद्रबिंदू ठाण्यात आहे. हा कलंक आणि गद्दाराचा शिक्का पुसण्यासाठी ही निवडणूक जिंकावीच लागेल. यासाठी मोठय़ा संख्येने मतदानासाठी बाहेर पडा, असे आवाहन खासदार राऊत यांनी केले.

खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटाचा समाचार घेतला. ते म्हणाले, काही जण स्वतःला कल्याणचे  सुभेदार समजत आहेत. मात्र महाविकास आघाडीचे कार्यकर्ते 4 जूनला त्यांची सुभेदारी बरखास्त करतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणारा हा जिल्हा आहे. त्यामुळे कल्याणवर शिवसेनेचा भगवाच फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याचे बेकायदेशीर मुख्यमंत्री हॉटेलवर बसून यंत्रणा हाताळत आहेत. काळय़ा पैशांचा वापर सुरू आहे. पण निवडणूक आयोग याकडे लक्ष देत नाही. निवडणूक आयोग आमची विमाने तपासतात, आमच्यावर लक्ष ठेवतात. माझं निवडणूक आयोगाला आव्हान आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गाडय़ा तपासा, ते ज्या हॉटेलमध्ये बसतात त्या खोल्या तपासा, सीसीटीव्ही फुटेज तपासा. मग काळा पैसा निवडणुकीत कोणत्या प्रकारे वापरला जातो त्याचा भंडापह्ड होईल, असे आव्हानच खासदार राऊत यांनी दिले. भिवंडी लोकसभेतही 100 टक्के नक्कीच बदल होणारच. गोडावून माफिया असलेल्या कपिल पाटील यांना कायमचे धक्क्याला लावा आणि भिवंडी लोकसभेच्या विकासासाठी बाळय़ामामा म्हात्रे यांना मोठय़ा मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहनही त्यांनी केले.