Lok Sabha Election 2024: नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांचा विजय, हिना गावित पराभूत

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या हिना गावित यांचा पराभव केला आहे. पाडवी यांनी गावित यांचा 1 लाख 13 हजार 769 मतांनी पराभव केला आहे.

नंदुरबार लोकसभेतील उमेदवार बदलण्याची मागणी महायुतीच्या घटक पक्षांकडून करण्यात आली होती. त्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शिंदे गट आणि अजित पवार गटाने उघडपणे नाराजी व्यक्त करून प्रचारापासून दूर राहण्याचे ठरवले होते. त्यानंतर या मतदारसंघात महायुतीत वाद उफाळून आला होत. त्याचा फटका देखील गावित यांना बसला

  • नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांचा विजय
  • महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी 87036 मतांनी आघाडीवर
  • नंदुरबारमधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी आघाडीवर
  • भाजपाच्या डॉ. हिना गावित 19396 मतांनी पिछाडीवर…
  • नंदुरबारमधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी 50 हजार मतांनी पुढे

नंदुरबार हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यामधील ४ व धुळे जिल्ह्यातील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

  1. तेरावी लोकसभा १९९९-२००४ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  2. चौदावी लोकसभा २००४-२००९ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  3. पंधरावी लोकसभा २००९-२०१४ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  4. सोळावी लोकसभा २०१४-२०१९ हीना गावित भारतीय जनता पक्ष
  5. सतरावी लोकसभा २०१९- हीना गावित भारतीय जनता पक्ष