दुश्मनी जमके करो, लेकीन फिर से दोस्त बने तो गुंजाईश रखो की शरमिंदा ना हो!

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत शेरोशायरीतून राजकारण्यांना चांगलेच चिमटे काढले. सध्या राजकारणात दोस्त आणि दुश्मन बनण्याची प्रकिया वेगाने होत असल्याचे सांगत राजीव कुमार म्हणाले की, ‘दुश्मनी जमके करो, लेकीन ये गुंजाईश रखो की, जब कभी हम फिर से दोस्त हो जाय, तो गुंजाईश रखो की शरमिंदा ना हो!’ पार्टीयों के तरफ से कमसे कम इतना गंदा ना बोला जाय, फिर कुछ हो ना सके. विविध पक्षांनी आरोप-प्रत्यारोप करताना मर्यादा सोडू नये, असाच इशारा त्यांनी यातून दिला. ‘ईव्हीएम’ मशीनवरील आक्षेपावर बोलताना ते म्हणाले की, ‘अधुरी हसरतो का इल्जाम हर बार हम पर लगाना ङ्खीक नही है, वफा खुद से नही होती खता, ईव्हीएम की करते हो.’