Lok Sabha Election 2024 : डेटिंग ऍपवरून मतदानासाठी जनजागृती

देशातील तरुण मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग करून घेण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच युवा पिढीमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या टिंडर डेटिंग अॅपवर ‘एव्हरी सिंगल व्होट काऊंट्स’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रथमच मतदान करणाऱया 20 दशलक्ष तरुण मतदारांना मतदानाकडे वळवण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरुण तसेच शहरी भागातील मतदारांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने समाजमाध्यमाचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर सुरू केला आहे. प्रथमच मतदान करणाऱयांना लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी ‘टार्ंनग 18’ या मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्याशिवाय टू आर दी वन हे अभियान सुरू केले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम एक्स, यूटय़ूब यासारख्या सर्व प्रमुख समाजमाध्यम मंचावर निवडणूक आयोग सध्या सक्रिय असून सार्वजनिक अॅप, व्हॉट्सअॅप, लिंक्ड वन या मंचाचाही वापर आयोगाने अलीकडेच सुरू केला आहे.