आसनगाव-कसारा लोकल फेऱ्यांमध्ये वाढ न करणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील चाकरमान्यांच्या तोंडाला पाने पुसल्याने असंतोष असतानाच त्यात भर म्हणून सध्या सुरू असलेल्या लोकल फेऱ्यांमध्ये वंदे भारत आणि अन्य एक्स्प्रेस गाड्यांचा अडथळा आणून ठेवला आहे. वंदे भारत आणि इतर एक्स्प्रेस गाड्यांमुळे आधीच लोकल उशिराने धावत असताना फास्ट लोकलही धीम्या मार्गावरून चालवण्यात येत असल्याने चाकरमान्यांच्या मस्टरवर रोजच लेटमार्कचा शेरा पडत आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून केव्हाही मोठा भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आसनगाव व कसारा लोकल फेऱ्यांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. लवकरच त्यात काही फेऱ्या वाढवून चाकरमान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना मध्य रेल्वेने नुकतेच एक वेळापत्रक जारी केले असून त्यात आसनगाव व कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल सेवेत एक फेरीही वाढवलेली नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये कमालीचा असंतोष आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना अक्षरशः दरवाजाला लटकत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. लोकलमधून पडल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याच्या घटना समोर असतानाही निर्वावलेले रेल्वे प्रशासन टिटवाळा ते कसारा दरम्यानच्या प्रवाशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना वाढीस लागली आहे.
याही मागण्यांकडे लक्ष द्या !
■ आसनगाव स्थानकात अर्धवट स्थितीत असलेल्या होम प्लॅटफॉर्मचे काम तत्काळ सुरू करा.
■ कसारा दिशेकडील तोडलेला पादचारी पूल बांधा. खडवलीतही पादचारी पूल उभारा.
■ कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या पहाटेच्या दोन लोकलदरम्यान एक नवीन लोकल वाढवा.
■ महिलांसाठी स्वच्छतागृहे वाढवा. मनस्ताप सहन करावा लागत असतानाच आता कसारा व आसनगाव येथील अप आणि डाऊन लोकल थांबवून वंदे भारत व अन्य मेल, एक्स्प्रेस पुढे काढल्या जातात. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकडे निघालेल्या लोकल तब्बल २० मिनिटे लेट होतात. त्यामुळे चाकरमान्यांच्या मस्टरवर रोजच लेटमार्क होत असल्याची माहिती कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनच्या