राज्यभरातील शिक्षकांचा सत्कार

लायन्स क्लब इंटरनॅशनलने काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयात शिक्षक दिनाचे आयोजन केले.  या वेळी महाराष्ट्रातील विविध शाळांमधील 60 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला  शिक्षक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक आहेच परंतु नवी पिढी घडवून देश अधिक बळकट आणि सक्षम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. शिक्षक हे समाजासाठी सदैव आदर्श राहिले आहेत. आजच्या आधुनिक काळातदेखील शिक्षकांचे महत्त्व अधिक आहे, शिक्षकांनीही ही जबाबदारी यापुढील काळात जोपासून नवा समाज घडविण्यावर भर द्यावा, असे विचार माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी व्यक्त केले.