एलआयसीचा मेगा सेल, मेट्रो शहरांतील मालमत्ता विकणार

एलआयसीने मेट्रो शहरांतील रिअल इस्टेट मालमत्ता विकण्याची तयारी केली आहे. या मालमत्ता विक्रीतून सहा ते सात अब्ज डॉलर उभे करण्याची एलआयसीची योजना आहे.

एलआयसी भूखंड आणि व्यावसायिक इमारती विकणार असल्याचे समजते. एलआयसीकडे दिल्लीतील कॅनोट प्लेस येथील जीवन भारती बिल्डिंग, कोलकाता येथील चित्तरंजन अव्हेन्यूची एलआयसी बिल्डिंग, मुंबईतील एशियाटिक सोसायटी आणि अकबर अलीजच्या मालमत्तांचा समावेश आहे. एका अहवालानुसार, अंतिम म्ल्यांकनादरम्यान या मालमत्तांची एकूण किंमत 50 ते 60 हजार कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील या विमा कंपनीकडे 51 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. एलआयसीने त्यांच्या अनेक मालमत्तांचे मूल्यांकन केलेले नाही. हे मूल्यांकन वास्तविक मूल्यापेक्षा पाच पट अधिक असू शकते.

2023-24 या आर्थिक वर्षात एलआयसीचा नफा 40 हजार 676 कोटी रुपये इतका होता. सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनीच्या जमिनीच्या मालकीच्या बाबतीत तिसऱया क्रमांकावर आहे. एलआयसी तिच्या मालमत्तांचे व्यवस्थापन आणि विक्रीसाठी एक नवीन संस्था तयार करू शकते.