डावखुरा फलंदाज सौरभ तिवारीने 17 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीनंतर व्यावसायिक क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. झारखंडच्या तिवारीने 3 वनडेत हिंदुस्थानी संघाचे प्रतिनिधित्व केले असून तो चार वेगवेगळय़ा आयपीएल संघातूनही खेळला होता. तिवारीने 3 वन डेत 49 धावा केल्या होत्या. तसेच झारखंडकडून खेळताना 189 डावांत 47.51 धावांच्या सरासरीने 8030 धावा केल्या आहेत. यात 22 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तिवारीने आयपीएलमध्ये 1494 धावाही केल्या आहेत. यंदाच्या मोसमात तो झारखंडसाठी चार सामने खेळला होता. मात्र त्याचा संघ साखळीतच बाद झाल्यामुळे त्याने आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. अकराव्या वर्षापासून त्याने आपली क्रिकेट कारकीर्द सुरू केली होती.