राहुल गांधींच्या घराचा पत्ता बदलला

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या घराचा पत्ता बदलला आहे. त्यांना दिल्लीत नवा बंगला देण्यात आला आहे. आज काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांच्या नवीन बंगल्याची पाहणी केली.

राहुल यांना सुनेरी बागेत बंगला क्रमांक 5 देण्यात आला आहे. यापूर्वी राहुल गांधी यांचे अधिकृत निवासस्थान 12 तुघलक लेन, नवी दिल्ली होते.