Latur News – निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज 24 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता निम्र तेरणा प्रकल्पाचे 4 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

निम्र तेरणा प्रकल्पातून नदीपात्रात 1526 क्यूसेक (43.226 क्युसेक) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे प्रकल्पाखालील तेरणा नदी काठावरील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन निम्र तेरणा प्रकल्प पूर नियंत्रन कक्षामार्फत करण्यात आले आहे.