लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 106 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 106 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. 193 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैद्य होते. त्यातील 87 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले आहेत.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये 37 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यातील तब्बल 19 जणांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. सध्या निवडणुकीच्या मैदानात 18 उमेदवार राहिलेले आहेत. 235 लातूर शहर विधानसभा मतदारसंघात 34 उमेदवारांची अर्ज वैद्य ठरले होते. त्यातील 11 उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज परत घेतले. निवडणुकीच्या रिंगणामध्ये 23 उमेदवार शिल्लक आहेत. 236 अहमदपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 42 उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरलेले होते. त्यातील 22 उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले असून निवडणुकीच्या रिंगणात 20  उमेदवार शिल्लक आहेत. 237 उदगीर(अजा) राखीव असलेल्या या विधानसभा मतदारसंघांमध्ये 22 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते .त्यातील 9 जणांनी आपली उमेदवारी अर्ज परत घेतले असून निवडणुकीच्या रिंगणात 13 उमेदवार शिल्लक आहेत. 238 निलंगा विधानसभा मतदारसंघांमध्ये 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले होते त्यातील 9 उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले असून निवडणुकीच्या रिंगणात 13 उमेदवार शिल्लक आहेत. 239 औसा विधानसभा मतदारसंघांमध्ये 36 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले होते . 17 उमेदवारांनी आपले अर्ज भरत घेतले, असून 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत.