औरादचा तेरणाकाठ गारठला… पुन्हा कमाल तापमान 9 अंश सेल्सिअस

लातूरमधील औराद शहाजनीसह आजुबाजूच्या परिसरामध्ये सरासरीपेक्षा जास्त अधिकचे पाऊस झाला. या जास्त झालेल्या पावसामुळे या भागातील नदी, नाले, साठवण तलाव भरून वाहत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी आज रोजी शेतीला पाणी देण्याची कामे जोमात सुरु आहेत त्यामुळे संपूर्ण परीसरात सध्या थंडगार वातावरण निर्माण झालेले आहे आणि अशातच वातावरण बदल झाल्यामुळे रात्रीच्या वेळी सुटलेले वारे थंडगार गारट्याप्रमाणे लागत आहे आणि सकाळी पाण्याचे धुई पडत असल्याने थंडगार वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे दिवस मावळला की थंडगार गारटा सुटत आहे आणि सकाळी दहा वाजेपर्यंत थंडीची हुडहुडी राहत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना या थंडीमुळे भरपूर त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान मागच्या आठ दिवसांपासून दररोज थंडीचे प्रमाण वाढत असल्यामुळे सध्या औराद शहाजानी परिसरात महाबळेश्वर पेक्षाही थंडीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. काल 10 अंश सेल्सियस तर आज 29 नोव्हेंबर रोजी चक्क 9 अंश सेल्सियसची नोंद झाली आहे त्यामुळे लोकांना व शेतकऱ्यांना शेकोट्यांचा उबदार आधार घेऊन कामकाज करावे लागत आहे गरम कपडे परीधान केल्याशिवाय बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.

या थंडीचे वातावरण पिकांसाठी पोषक असले तरी अती थंडी सुध्दा रब्बी पिकांचे नुकसान करण्यासाठी सुध्दा कारणीभूत ठरु शकेल याचीही दाट शक्यता नाकारता येणार नाही असा इशारा हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या नोव्हेंबर महिना सुरू असून, पुढील 3 महिन्यांत थंडी वाढणार आहे. परिणामी, पिकांनाही याचा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान थंडीमुळे रात्री लवकर बाजारपेठ ठप्प होत आहेत तर सकाळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. गेल्या 8 दिवसांपासून उत्तरेकडून येणारे थंडगार वारे वाहू लागल्याने थंडी जोरदार जाणवू लागली आहे त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांनी व लहान बालकांना काळजी घेऊन गरम उबदार कपडे वापरण्याचे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

सध्या थंडीचे प्रमाणात अधिक वाढ होत चालली आहे. जेष्ट नागरिक, वयोवृद्धांना सांधेदुखी, दमा व लहान मुलांना सर्दी, ताप खोकल्याचे प्रमाणात वाढ होत आहेत. दरम्यान सध्या तरी पेशंट कमी आहेत. परंतु आगामी काळात वाढणाऱ्या थंडीमुळे रुग्णसंख्या वाढेल अशी शक्यता आहे. – डॉ. सुनिल पोतदार, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र औराद शहाजानी

सोमवारी सकाळी पासुन औराद शहाजानी परीसरात थंडीचे प्रमाणात वाढ होत असल्याचे नोंद होत असल्याचे दिसून येत असतानाच आज सकाळी पुन्हा पाहणी केली असता 9 सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे दिसून आले त्यामुळे मागच्या पाच दिवसांपासून दैनंदिन थंडीचे प्रमाणात वाढ होत असल्याची नोंद होत आहे. – मुक्रम नाईकवाडे, हवामान केंद्र निरीक्षक