झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा सफाया निश्चित; हेमंत सोरेन यांचा दावा

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. त्यानंतर शनिवारी त्यांनी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. झारखंडमधील भाजपचा प्रभाव संपुष्टात आणण्याची वेळ आली आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा सफाया निशअचित आहे, असा दावाही त्यांनी केला. झारखंड विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचे भाजपचे दिवास्वप्न आहे. ते फक्त मुंगेरीलाल के हसीन सपने बघत आहे. मात्र, आता जनता भाजपचा सफाया करण्यासाठी सज्ज आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आदिवासी समाजाच्या व्यक्तींना भाजपने मुख्यमंत्री केले. मात्र, त्यांचा वापर फक्त रबर स्टॅम्प म्हणून केल्याचा आरोपही सोरेन यांनी केला. झारखंडमध्ये भाजपला घरघर लागली आहे. आता त्यांचा राज्यात सफाया करण्याची हीच वेळ आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झारखंडमधून भाजपचा सफाया होणार आहे. जनता झारखंडमधून भाजपचे मानोनिशाण मिटवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोणीही सत्य लपवू शकत नाही, ते सर्वांसमोर येते. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी झारखंडमधील मूळ रहिवासी आणि आदिवासींना बळ दिले आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचे भाजपची महत्त्वाकांक्षा ही फक्त दिवास्वप्न आहे. ते कधीही सत्यात येऊ शकत नाही. आमच्याविरुद्ध कटकारस्थान रचणाऱ्यांना जनता निवडणुकीत चोख प्रत्युत्तर देईल, असेही सोरेन म्हणाले. भाजपने सर्व सरकारी संस्थावर ताबा मिळवत त्याचा गैरवापर केला. मात्र, लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना धडा शिकवला. आता विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा सफाया होईल, असा विश्वासही सोरेन यांनी व्यक्त केला.