लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती स्थिर

भाजपचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना आज दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.

96 वर्षीय लालकृष्ण आडवाणी यांना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्सच्या युरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. तीन महिन्यांपूर्वी पेंद्र सरकारने आडवाणी यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले होते.