Kuno National Park: कूनो अभयारण्यातून आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी फोटो शेअर करत दिली माहिती

मध्य प्रदेशच्या श्योपुरमधील कूनो राष्ट्रीय अभयारण्यातून आनंदाची बातमी समोर आली आहे. एक मादी चिता गर्भवती असून लवकरच ती बछड्यांना जन्म देणार आहे. याबाबत खुद्द मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी गर्भवती मादी चीत्त्याच्या फोटो सोशल मीडियावर शेअर करत कुनोची ही आनंदाची बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली. दरम्यान, मोहन यादव यांनी मादी चित्ताचे नाव लिहिलेले नाही. मात्र फोटोमध्ये ती चित्ता मादी विरा दिसत आहे. जिला मागच्या महिन्यात ग्वाल्हेर येथून पकडून आणले होते. फोटो पाहून तज्ज्ञांनी सांगितले की, पुढच्या दोन ते पाच दिवसात आनंदाची बातमी मिळणार आहे. या पार्कात वीरा, नरिभा आणि धीरा नावाच्या मादी आहेत. ज्या माता झालेल्या नाहीत. तर वीरा पवनसोबत बराच काळ एकत्र होते. त्यामुळे ती मादी वीरा असल्याची शक्यता आहे.

17 सप्टेंबर 2022 रोजी कूनोमध्ये सुरु झालेला प्रोजेक्ट चीत्ता अंतर्गत नामबियाहून 8 आणि साऊथ आफ्रिकेहून 12 2 म्हणजे 20 चित्ते पार्कात आणले होते. ज्यामध्ये 8 वयस्कर चित्त्यांचा मृत्यू झाला. तर हिंदुस्थानात आल्यावर 17 बछड्यांचा जन्म झाला, ज्यामध्ये 12 जिवंत आहेत. यामुळे कूनो अभयारण्यात 12 वयस्कर आणि 12 बछडे चित्ते सध्या आहेत.