शिंदे गटाचा बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेला अटक; न्यायालयाने सुनावणी तीन दिवसांनी पोलीस कोठडी

शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे याची काही दिवसांपूर्वी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्यील पंकजा मुंडेंना कशाप्रकारे मदत केली नाही. धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या संदर्भातील संवाद आहे. या प्रकरणी कुंडलिक खांडे याच्यावर गुन्हा देखील झाला आहे. मात्र, त्यांच्यावर काही महिन्यापूर्वी 307 चा गुन्हा देखील दाखल झाला होता. याच गुन्ह्यात खांडेला अटक झाली आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी खांडे याच्यावर 307 चा गुन्हा दाखल झाला होता. जामखेड येथे कुंडलिक खांडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी जामखेड येथील कलाकेंद्रातून त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुंडलिक खांडेला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड -नगर महामार्गावरील जामखेड येथून त्यांना अटक केली. तसेच त्याला बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. कुंडलिक खांडे याची कथित एक ऑडिओ क्लिप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर परळी आणि बीडमध्ये पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धोका देत खांडे यांनी बजरंग सोनवणे यांचं काम केल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये केला जात आहे. ऑडिओ क्लिपमध्ये खांडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबत वक्तव्य केले होते.

अजित पवार गटाचे नेते वाल्मिक कराड यांच्या तक्रारीवरून कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्या विरुद्ध परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी एलसीबी आणि परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पथक रवाना झाली होती.दरम्यान जामखेड येथे कुंडलिक खांडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे जामखेड येथून कुंडलिक खांडेच्या मुसक्या आवळल्या. त्याला सकाळी बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी शनिवारी दुपारी खांडेला बीडच्या न्यायालयात हजर केले. तसेच तपासासाठी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीचे वकील बी डी कोल्हे यांनी अटकच अवैध असल्याचा दावा न्यायालयासमोर केला. मात्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुसरे न्या. एस. टी. सहारे यांच्या न्यायालयाने खांडेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे आता कुंडलिक खांडेच्या अडचणी वाढल्या आहेत.