देशाच्या अनेक भागांना रविवारी उष्णतेच्या तीव्र लाटेला सामोरे जावे लागले. दरम्यान हवमान विभागाने महाराष्ट्रात विदर्भाला उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, तापमानाचा पारा वाढला असून कोपरगावात बुधवारी 42 अंशांच्या दरम्यान नोंद होत आहे.
कोपरगांव तालुक्यात यापुर्वी एकशे सदोतीस वर्षात 22 मे 2017 रोजी सर्वाधिक 44 अंश तपमानाची नोंद झाली होती. तर 15 मे 2016 रोजी उष्णतेचा पारा 42.5 अंश, 2 ते 19 एप्रिल 2016 रोजी 42 अंश, 15 मे 2016 रोजी उष्णतेचा पारा 42.5 अंश सेल्सीयस नोंद झाल्याची माहिती जेउरकुंभारी हवामान केंद्र प्रमुखांनी दिली होती. 22 जानेवारी 2016 रोजी कोपरगांव तालुक्यात प्रचंड थंडी पडली होती तेंव्हा निचांकी 5 अंश सेल्सीयस अशी तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर 20 मे 2021 रोजी 37 अंश तपमान नोंद झाली आहे.
नागरिकांनी उन्हात फिरू नये, शक्यतो सुती कपडे वापरावे, जेवणांत कांदा वापरण्यांचे प्रमाण वाढवावे, पिण्यांचे पाणी जास्तीत जास्त प्यावे, उष्माघाताची काळजी घ्यावी, पशु पक्षांसाठी पाणी ठेवावे. एप्रिल 2024 मध्ये गेल्या आठवडाभरातील कोपरगांवचे तपमान माहितीच्या महाजालावर संशोधन केले असता 8 एप्रिल (39.23), 9 एप्रिल (39.24), 10 एप्रिल (40.26), 11 एप्रिल (41.26), 12 एप्रिल (39.27), 13 एप्रिल (39.00), 14 एप्रिल (39.25), 15 एप्रिल (39.24), 16 एप्रिल (39.24), 17 एप्रिल (40.26) अश तपमानाची नोंद झाली आहे. 17 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तपमानाचा पारा 41.28 अंश सर्वाधिक नोंदला गेला. गुगलवर कोपरगाव चा तापमापकाचा पारा 42 पॉईंट 28 इतका दाखवला जात होता.उष्माघाताची लाट सर्वत्र निर्माण झाल्याने रात्री एक वाजेपर्यंत हवा तापलेलीच असते, त्याचा परिणाम नागरिकांच्या झोपेवर झाला आहे, दिवस रात्र जागं राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, ग्रामिण भागात भयानक चित्र आहे, कारण वीज गायब असते त्यामुळे जनावरांना पाणी कोठुन आणि कसे द्यायचे हा त्यांच्या समोर प्रश्न आहे. या नागरिकांना ना पंख्याची हवा खाता येत अन उघडयावर बसले तर साधी हवेची झुळुक देखील येत नाही.
कोपरगांव शहरवासियांना सध्या 9 ते 14 दिवसांने पाणी मिळत आहे. पिण्यांच्या पाण्यांसाठी वणवण भटकंती करावी लागत आहे तर ग्रामीण भागात सर्रास सायकलला प्लॅस्टीकचे ड्रम टांगुन मिळेल तेथुन पाणी आणण्यांचा उपक्रम बाया बापड्या, लहान मुले, महिला भगिनी राबवित आहे. या उष्णतेचा परिणाम यंदाच्या पावसाळयावर होवुन तो चांगला होईल असा अंदाज जुने जाणकार मंडळी सांगत आहेत.
सन 2012 पासुन कोपरगांव तालुक्यावर दुष्काळाचे सावट असुन गोदावरी कालव्यांना बारमाही पाणी न आल्याने भूगर्भातील पाण्यांची पातळी खोलवर गेली आहे त्यामुळे बारमाही पटटयातही विहीरी आटल्या आहे, टँकरच्या पाण्यांची मागणी वाढु लागली आहे. पर्यावरणाचा असमतोल ढासळत चालल्याने हवेतील उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत तर अंतराळ शास्वाचा अभ्यास करणा-या नासा अमेरिकन संशोधन संस्थेने सुर्यावर होणा-या सौर वादळामुळे व ओझोन वायुचा थर कमी कमी होत असल्यांने पृथ्वीवर तपमानात वाढ होत असल्याचे निरीक्षण नोंदले आहे. भारत देशानेही सुर्य आणि त्याच्या मंडलाचा अभ्यास करण्यासाठी भास्कर यान पाठविले आहे.