किश्तवारमधील 23 व्यक्ती दहशतवादी घोषित

पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधून दहशतवादी कारवाया करणाऱया किश्तवारमधील 23 दहशतवाद्यांना दोडा येथील विशेष न्यायालयाने निर्ढावलेले गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. हे गुन्हेगार एक महिन्याच्या अवधीत न्यायालयासमोर हजर न झाल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल, असे कोर्टाने म्हटले आहे. आजच्या निकालामुळे, किश्तवारमधील एकूण 36 व्यक्ती गुन्हेगार म्हणून जाहीर झाल्या आहेत. यापैकी 12 जणांच्या मालमत्तांची माहिती पोलिसांकडे असून, आधीच्या 13 दहशतवाद्यांपैकी सातजणांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया कोर्टाने सुरू केली आहे.