Jammu Kashmir- जम्मू- कश्मीरमध्ये दोन जवानांचे अपहरण; एक शहीद तर एक जण जखमी

जम्मू – कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनागमधील शांगास भागात दहशतवाद्यांनी दोन जवानांचे अपहरण केले होते. या जवानाचा मृतदेह बुधवारी पहाटे अनंतनाग परिसरात सापडला आहे. हिलाल अहमद भट असे या जवानाचे नाव आहे . अपहरण झालेल्या दुसरा जवान दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटला होता मात्र तो गोळीबारात जखमी झाला आहे. अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपहरणाची ही घटना मंगळवारी घडली आहे.

8 ऑक्टोबर रोजी सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान प्रादेशिक लष्कराच्या 161 तुकडीतील दोन सैनिकांचे अनंतनागच्या जंगल परिसरातून अपहरण करण्यात आले होते. यानंतर या दोघांमधी एका जवानाने तेथून पळ काढून स्वत: ची सुटका करण्यात यशस्वी झाला. मात्र यानंतर झालेल्या गोळीबार तो जखमी झाला. या घटनेनंतर लष्करी सैनिकांनी दुसऱ्या सैनिकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान बुधवारी या जवानाचा मृतदेह अनंतनाग परिसरात बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांसह सापडला आहे. याबाबतची माहिती लष्कराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि जम्मू-कश्मीर पोलीस दलाकडूनमध्ये मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सध्या दहशतवादी हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या जवानावर उपचार सुरू आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवादी कारवाया पाहायला मिळत आहेत. ऑगस्टमध्ये सुरक्षा दलांनी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना अटक केली होती. कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांनी अटक केलेल्या साथीदारांच्या ताब्यातून एक पिस्तूल, एक मॅगझिन, 29 गोळ्या आणि दोन हातबॉम्ब जप्त केले आहेत.