गळ्यात चपलांचा हार घालून उमेदवार मागतोय मते

अलीगढ लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या केशव देव यांनी त्यांचे निवडणूक चिन्ह गळ्यात घालून प्रचार सुरू केला आहे. मात्र, हे निवडणूक चिन्ह चपला असल्यामुळे चर्चा आणि चेष्टेचा विषय बनला आहे. देव स्वतःच सात चपलांचा हार गळ्यात घालून आपला प्रचार दणक्यात करत असून मतदारांकडून मतांसाठी जोगवाही मागत आहेत.