लेबनॉनमधील पेजर स्फोटाचे केरळ कनेक्शन, वायनाडमध्ये जन्मलेला रिनसन जोस चर्चेत

लेबनॉनमध्ये हजारो पेजरचा एकाचवेळी स्फोट झाला आणि जवळपास 21 जणांचा मृत्यू, तर शेकडो लोक जखमी झाले. यातील हिजबुल्ला दहशतवाद्यांना टार्गेट करून हे स्फोट घडवून आणण्यात आले होते. जगभरात याची चर्चा असताना आता याचे केरळ कनेक्शन समोर आले आहे.

हंगेरीच्या एक मीडिया आऊटलेट टेकेल्सने दिलेल्या वृत्तानुसार, लेबनॉनमध्ये मंगळवारी झालेल्या पेजरच्या करारात बल्गेरियन कंपनी नॉर्टो ग्लोबल लिमिटेडचा सहभाग आहे. या कंपनीची स्थापना नॉर्वेच्या रिनसन जोस याने केली होती. रिनसन जोस हा मूळचा केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मनंतावडी येथील रहिवासी आहे. एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो नॉर्वेला गेला होता. अधूनमधून तो आपल्या घरीही येत होता.

रिनसनचे वडील जोस मूथेडम टेलर असून ते मनंतावडीमध्ये एका दुकानात काम करतात. या भागामध्ये त्यांना टेरल जोस नावाने ओळखले जाते. मात्र आता लेबनॉन पेजर स्फोट प्रकरणात मुलाचे नाव समोर आल्याने ते चिंतेत आहेत.

इस्रायलच्या हल्ल्यानंतर युद्धाचा भडका, बैरूतवर पुन्हा हवाई हल्ला; हिजबुल्लाहच्या अधिकाऱ्यासह 12 ठार

दुसरीकडे बल्गेरियाची तपास यंत्रणा एसएएनएसने केलेल्या तपासात असे आढळले की, रिनसन जोस किंवा त्याच्या नॉर्टो ग्लोबल कंपनीला शिपमेंटची मंजुरीच देण्यात आली नव्हती. त्यांनी रिनसनला क्लीन चिटच दिली आहे. मात्र रिनसनचे वडील आणि त्याचे नातेवाईक हे दहशतवादाशी संबंधित प्रकरण असल्याचे त्याच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत.

रिनसनच्या काकांचा मुलगा अजू जॉन याने मनोरमा ऑनलाईनशी बोलताना सांगितले की, त्याने बल्गेरियातील आपल्या कंपनीबाबत किंवा त्याच्या व्यवसायिक संबंधांबाबत आम्हाला कधीच माहिती दिली नाही. आम्हाला त्याची चिंता वाटत आहे.

पेजरनंतर वॉकीटॉकी, मायक्रोवेव्ह रेडिओ स्फोटांनी लेबनॉन हादरले; 21 ठार, 3500 जखमी

दरम्यान, रिनसन याला एक जुळा भाऊही असून त्याचे नाव जिनसन आहे. तो यूकेमध्ये राहतो आणि त्याची बहीण आयर्लंडमध्ये राहते. रिनसन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये हिंदुस्थानमध्ये आला होता आणि जानेवारीमध्ये परत गेला होता, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. रिनसनने मनंतावडीतील मेरी माथा कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर एमबीएचे शिक्षण घेऊन तो नॉर्वेला केअरटेकर म्हणून केला. पुढे त्याने व्यवसायही सुरू केला. मात्र त्याच्या नोकरीसंदर्भात किंवा व्यवसायासंदर्भात आम्हाला अधिक माहित नसल्याचे त्याचे काका थँकाचन यांनी सांगितले.