कारगिल विजय दिनी हिंदुस्थानने दाखवली ताकद, उत्तर प्रदेशात चित्तथरारक कसरती सादर

कारगील विजय दिवसाला 26 जुलै रोजी तब्बल 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर  12 जुलैपासून 26 जुलैपर्यंत हवाई दलाच्या वतीने चित्तथरारक कसरती सादर करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या सरसवा हवाई तळावर रविवारी जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. जेट सुखोई, राफेल जग्वार, एमआय 17 हेलीकॉप्टर, एएन-32 आणि डोर्नियर विमानांच्या माध्यमातून अधिकाऱयांनी कसरती सादर केल्या. हेलिकॉप्टमधून तब्बल दहा हजार फूट खाली उतरताना कमांडो दिसत होते.

जग्वार विमानांनी त्रिशूळ प्रकारात चित्तथरारक कसरती सादर केल्या. अंबाला येथून टेक ऑफ घेऊन सरसावा हवाई तळावरील मैदानच्या दिशेने विमाने झेपावली. कारगील विजय दिवसाच्या अंगाचा अक्षरशः थरकाप उडवणाऱया आठवणी हवाई दलाच्या अधिकाऱयांनी यावेळी सांगितल्या. 1999 मध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने कशा प्रकारे युद्धात प्रत्यक्ष कामगिरी बजावली याचे कथन त्यांनी केले.